समाजशास्त्र विषयाच्या संशोधक कु. सोपनल राजेंद्र भगत ( सौ. सोपनल रुपेश पिसे ) यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी बहाल केली आहे.
विभागीय संपादक निलेश रामगावकर
अमरावती:- सोपनल भगत यांनी यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणाचा पुनर्वसित गावातील लोकांवर झालेल्या सामाजिक व आर्थिक परिणामांचे समाजशास्त्रीय अध्ययन* या विषयावरील संशोधन प्रो. डॉ. सुधा खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून शोध प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता. परीक्षक म्हणून एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या र्डॉ. स्मृती भोसले होत्या.
कु सोपनल भगत ( सौ. सोपनल रुपेश पिसे ) यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल सिद्धार्थ हेंडवे, शालिनी हेंडवे, सुभाषराव कोल्हे, नलिनी कोल्हे, पुरुषोत्तमराव पिसे, शांताबाई पिसे, मयूर कोल्हे, ज्योती कोल्हे, ऐश्वर्या कोल्हे, प्रज्वल हेंडवे, उज्ज्वल हेंडवे, कनिष्क कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
