गावाकडची बातमी माहुर किनवट
पंकज जयस्वाल
पी.एम.श्री.जि.प.हायस्कूल वाई बाजार येथे 'स्वयंशासन दिन' उत्साहात संपन्न झाला. डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याच्या पाश्र्वभूमीवर हा 'स्वयंशासन दिन' किंवा 'टिचर्स डे' शालेय विद्यार्थ्यांकडून एक अनोखा उपक्रम म्हणून संपन्न केला.
या उपक्रमात एकूण ४९ विद्यार्थी सहभागी झाले होते.शाळेचे मुख्याध्यापक म्हणून फलक सय्यद इब्राल तर उपमुख्याध्यापक म्हणून अक्षरा गणेश पाटील या विद्यार्थ्यांनीनी जबाबदारी पार पाडली.सकाळी इयत्ता चौथी च्या सहभागी विद्यार्थ्यांनी परीपाठ सादर करत या परिपाठादरम्यान डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या प्रतिमेच्या पुजनाने या स्वयंशासन दिनाची सुरवात झाली.
इयत्ता १ली ते १०वी च्या सर्व वर्गांवर संपूर्ण दिवस बालक शिक्षकांनी नियंत्रण करत आपल्या अध्यापनाने दिवस गाजवला. संपूर्ण उपक्रमाचे आयोजन व नियोजन करणारे शिक्षकवृंद या संपूर्ण उपक्रमात सहकार्य करत होते.मुख्याध्यापक फलक सय्यद इब्राल हिने यावेळी बोलताना मी आदर्श शिक्षक बनणे हे ध्येय निश्चित केले असून.भविष्यात या अनुभवातून बरेच काही शिदोरीरुपी नेणार असून आज आम्हाला शिक्षकांची मेहनत आणि कष्ट काय आहेत हे कळले आहे असे शिक्षकांप्रती कृतज्ञतापूर्वक गौरवोद्गार काढले.तसेच उपमुख्याध्यापिका अक्षरा गणेश पाटील हिने ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्व गुरुजनांचे आभार व्यक्त केले.
या उपक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून मुन्नेश्वर थोरात,अनुराधा चौधरी आणि गीता कुमरे या अध्यापकांनी भूमिका वठवली.तसेच संपूर्ण आयोजन अर्चना गोल्हर या शिक्षिका तसेच सारंग साळूंखे,नरेंद्र गुरमुळे,किशोर कांबळे या शिक्षकांच्या साथीने योजले.बालक शिक्षकांची निवड,त्यांची व्यवस्था आणि सहकार्य हेतू प्रशांत धडेले,गुरूलिंग वाळके,विशाल कान्नव,सय्यद जाफर,भारत नागोशे व स्वप्नील राठोड यांनी परिश्रम घेतले.
स्वयंशासन दिनाच्या समारोप सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमजद खान पठाण यांनी अध्यक्ष म्हणून पद भूषवत तसेच युसूफ अकबानी व मोहसीन खान यांनी प्रमुख अतिथी म्हणून स्थान भूषवले.अध्यक्ष यांनी बोलताना या उपक्रमाचे विशेष कौतुक करत शाळा हे ज्ञानमंदिर आहे आणि प्रत्येक विद्यार्थी एक साधक आहे असे म्हणत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांकडून या उपक्रमात विशेष क्रमांक पटकावणाऱ्या बालक शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यात प्रथम श्लोक अरविंद पवार व अरशिया इमरान खान पठाण संयुक्त,द्वितीय केनिल राजेंद्र गोल्हर वमुश्फीरा मोहसीन खान संयुक्त,तृतीय शाश्वती संतोष टोके व अलिशा युसूफ अकबानी संयुक्त,चतुर्थ वेदिका बालाजी नामावार व सिद्धार्थ शिवाजी राठोड संयुक्त तसेच पाचवी म्हणून हृदया मिलिंद कंधारे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमात सर्व शालेय विद्यार्थ्यांसह शिवाजी तलांडे व सहकारी कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण सहयोग दिला.या उपक्रमाच्या सांगता समारोहाचे संचलन प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद कंधारे यांनी तर आभार मुनेश्वर थोरात यांनी मानले.
