गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळाचा उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
किनवट: कमठाला ता. किनवट गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळ, कमठाला यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर, कमठाला येथे होणार आहे.
या उपक्रमामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, वजन व BMI तपासणी तसेच डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करून घेण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले असून, ‘रक्तदान करा... जीवनदान द्या!’ असा संदेश देत नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होत असल्याने या सामाजिक उपक्रमात तरुणांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
‘आपले आरोग्य तपासा आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात कमठाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच पात्र रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळ, कमठाला यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(*शिबिराचा तपशील :*
*दिनांक : २१ सप्टेंबर २०२६, सोमवार*
*वेळ : सकाळी १० वाजता*
*स्थळ : विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर, कमठाला*
*आयोजक : सार्वजनिक गणेश मंडळ, कमठाला*
*संपर्क मोबाईल: 7498301375 - 9699899388 - 7822023499 - 7666852263- 9921353509*)

