श्री रेणुका देवी संस्थानतर्फे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन

 

रेणुका माता


  गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे अध्यक्षा हिराबाई शेळके यांचे आवाहन






श्रीक्षेत्र माहूर

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून अमोघ कलौती धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रेणुका देवी संस्थान व सह धर्मादाय आयुक्त कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळा माहुर येथे दि 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10-30ते 4.00 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त गरजुंनी या आरोग्य शीबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सह धर्मादाय आयुक्त नांदेड तथा संस्थानचे पदसिध्द अध्यक्षा हिराबाई शेळके यांनी केले आहे.


  श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी विविध जन उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत असुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आदिवासी बंजारा बहुल भागातील गोरगरीब रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरात विविध आजारांच्या तज्ञ डॉक्टराकरवी मोफत रोगनिदान व उपचार करण्यात येणार आहे.

या शिबीरात डॉ . अच्युत कन्नावार हृदय रोग तज्ञ.डॉ.संदीप दरबस्तवार जनरल सर्जन, डॉ.अभिषेक चक्करवार जनरल सर्जन, डॉ नितिण जोशी जठर व पचनसंस्था तज्ञ, डॉ.अभिषेक काबरा जठर व पाचन संस्था, डॉ.स्वप्नील चक्करवार अस्थिरोग तज्ञ, डॉ.वेदांत लाखे मुत्ररोग तज्ञ, डॉ.नविण छत्ताणी मुत्रपिंड विकार तज्ञ,डॉ.शितल भंडारी स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ.रति वावधाने स्त्रीरोग प्रसुती तज्ञ, डॉ. श्रीधर आरुसकर स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, डॉ.धिरज चिंतावार त्वचारोग तज्ज्ञ, डॉ.संदीप वावधाने त्वचारोग तज्ञ, डॉ.गौरव पटेल कान,नाक, घसा तज्ञ, डॉ.सतिश घुले कान,नाक घसा तज्ञ, डॉ.विद्याधर भेदे मज्जा रोग तज्ञ, डॉ.अनिल आखरे बालरोग तज्ञ, डॉ.तुषार देशपांडे, बालरोग तज्ञ, डॉ,भानुप्रकाश कदम बालरोग तज्ञ, डॉ.प्रशांत चक्करवार, मानसोपचार तज्ञ, डॉ.विनोद जाधव मानसोपचार तज्ञ, डॉ.रुद्र पाटील ऑर्थो स्पाईन सर्जन, डॉ.श्रीकांत गोटे,जनरल फिजीशियन, डॉ.अनंत जनरल फिजीशियन, डॉ.ओमप्रकाश साबळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी माहुर, डॉ.राजेश माचेवार तालुका आरोग्य अधिकारी माहुर, संजीवनी नेत्ररुग्णालय आरोग्य विभाग जि.प.नांदेड, वैद्यकीय संघटना माहुर हे सेवा देणार आहेत,तरी सर्व गरजु रुग्णांनी या आरोग्य शीबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post