दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर किन्ही येथे शेतकरी पोळा साधेपणाने साजरा
जिल्हा विशेष प्रतिनिधी सुनिल धुर्वे
दारव्हा |यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील किन्ही येथे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पोळा साधेपणाने साजरा करण्यात आला. माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांसोबत पोळा साजरा केला.
यावेळी रयत क्रांती संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष प्रिया राऊत, आरोग्य विभागाचे सचिव श्री. काटकर साहेब तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणी अधोरेखित करण्यासाठी यंदाचा पोळा साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शेतकरी व त्यांच्या पशुधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

