धामणगाव रेल्वेत तान्हा बैलपोळा उत्साहात साजरा”

 

पारंपरिक वेशभूषा, सजविलेले बैल आणि उत्साहाचे वातावरण



पारंपरिक वेशभूषा, सजविलेले बैल आणि उत्साहाचे वातावरण


धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा सण तान्हा बैलपोळ्याच्या निमित्ताने परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांनी आपल्या आवडत्या बैलांच्या प्रतिकृती आकर्षक पद्धतीने सजवून या पारंपरिक सणात सहभाग घेतला.

बैलांना रंगीबेरंगी सजावट, फुलांच्या माळा तसेच विविध अलंकारांनी सजविण्यात आले होते. लहान मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून बैलांची पूजा केली. यावेळी परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

तान्हा बैलपोळ्याच्या माध्यमातून मुलांना ग्रामीण संस्कृती, शेती आणि बैलांचे शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्व समजावे, तसेच पारंपरिक सणांची माहिती मिळावी, हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाला नागरिक, पालक आणि बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तान्हा पोळा मित्र मंडळीच्या वतीने सहभागी बालगोपालांना प्रोत्साहन देण्यासाठी २०० पेक्षा अधिक प्रोत्साहनपर बक्षिसांचे वाटप करण्यात आले. च्यामुळे बालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाला सरपंच विजेंद्र दरवडकर, गजानन पुराण, श्रीकृष्ण कुमरे, उमेश इंज्ञाळकर, राहुल वगारहांडे, मंगेश काकडे, नितीन सहारे, हरीश पुराण, नाना नागोसे, नरेंद्र कुमरे, इमराम शहा, सतीश तितरे, शैलेश शहारे, सुधाकर सहारे, सुभाष कानाके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पारंपरिक संस्कृती व ग्रामीण परंपरा जपणारा हा तान्हा पोळा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post