बैलजोड्यांचा तुटवडा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सिंदखेड | प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा पारंपरिक सण असलेल्या पोळ्यावर यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. सिंदखेड परिसरात बैलजोड्यांची संख्या घटल्याने पोळा सणाची रंगत कमी झाली आहे. त्यातच पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने पिकांची परिस्थिती चिंताजनक बनली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
माहूर व किनवट तालुक्यातील परिस्थितीची शासन-प्रशासनाने तातडीने पाहणी करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
गावाकडची बातमी | माहूर-किनवट
पंकज जयस्वाल | मो. 9421367593
