माळ बोरगावात पोळा सण उत्साहात

 





किनवट : तालुक्यातील माळ बोरगाव येथे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा पोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी बैलांना स्वच्छ अंघोळ घालून फुलांचे हार, गोंडे, झुली व घंटांनी सजविले. बैलांची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी डॉ. पुंडलिक गोमाजी आमले यांनी गावात उपस्थित राहून शेतकरी बांधवांसोबत पोळा सणाचा आनंद घेतला. त्यांनी शेतकरी आणि बैल यांचे नाते हे ग्रामीण संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले.


बैलांच्या आकर्षक सजावटीमुळे आणि शेतकऱ्यांच्या उत्साहामुळे माळ बोरगावात दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.


🌾 बळीराजाला सलाम… बैलजोडीला मानाचा मुजरा!

Post a Comment

Previous Post Next Post