शिक्षक दिनानिमित्त तळेगाव दशासर येथे शिक्षकांचा सन्मान

 


पत्रकारांच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक कन्या शाळेतील शिक्षकांचा गौरव


विभागीय संपादक /निलेश रामगावकर 


 शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त


अमरावती/तळेगाव दशासर शिक्षक दिनाचे औचित्य साधून तळेगाव दशसर येथील पत्रकारांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक कन्या शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत तसेच समाजाच्या विकासात शिक्षकांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत पत्रकारांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी शिक्षकांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करीत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

शिक्षक दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून, समाज घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अनेक अडचणींवर मात करत शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकारांच्या वतीने करण्यात आलेला सन्मान हा शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post