" आंतरजातीय विवाह, जातीवाचक शिवीगाळ, मानसिक व शारीरिक छळ,हुंडायसाठी पैस्याची मागणी, इत्यादी प्रकरण अंगलट आले"
किनवट तालुक्यातील रोहिदास तांडा येथील प्रभाकर व्यंकटी चव्हाण व त्यांचे कुटुंबातील सदस्यांसह इतर एकूण 23 व्यक्तीवर फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार ॲट्रॉसिटी व हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार किनवट पोलीस स्टेशनला दिनांक 1सप्टेंबर 2026 ला रात्री 22: 39 वाजता विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी ही अनुसूचित जातीची असून आरोपी हे बिगर अनुसूचित जाती जमातीचे आहेत. आरोपी प्रभाकर व्यंकटी चव्हाण राहणार रोहिदास तांडा यांनी फिर्यादीचे शेतात ट्रॅक्टरने नांगरणी केली कामाचे पैसे मागण्यासाठी तो फिर्यादीच्या घरी गेला, फिर्यादी शिवाय दुसरे कोणीच घरी नसल्याने फिर्यादीने पुन्हा येण्यास सांगितले यावेळी आरोपीने फिर्यादी कडून मोबाईल नंबर घेतला आणि मोबाईल संपर्कातून दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये 2020 ला आंतरजातीय विवाह झाला.त्यानुसार ते दोघे नांदेड येथे राहावयास गेले तेथे त्यांना एक अपत्य जन्माला आले. त्यानंतर दोघे रोहिदास तांडा येथील राहत्या घरी आले असता आरोपीचे आई, वडील, पहिली पत्नी, मुले, भाऊ व नातेवाईकांनी तू हलक्या जातीचे आहेस असे हिणवून फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली व फिर्यादीचे सामान फेकून देण्यात आले. आरोपीने पहिले लग्न झाले व मुले असल्याची माहिती लपवून ठेवली होती. यानंतर समाजातील पंचामार्फत बैठका झाल्या त्यानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने नांदेड येथील महिला सहाय्यक भरोसा सेल, आणि पोलीस स्टेशन किनवट येथे अन्याय झाल्याची तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादी नुसार ॲट्रॉसिटी व इतर कलमानुसार 23 व्यक्तीवर कारवाई करण्यात आली या आरोपीमध्ये प्रभाकर व्यंकटी चव्हाण, व्यंकटी रोहिदास चव्हाण, कमलाबाई व्यंकटी चव्हाण, आरोपीची पहिली पत्नी प्रतीक्षा प्रभाकर चव्हाण, मुले विजय प्रभाकर चव्हाण, अजय प्रभाकर चव्हाण,तर इतर नातेवाईक दिलीप व्यंकटी चव्हाण, कविता दिलीप चव्हाण, नामदेव रोहिदास चव्हाण, किसन रोहिदास चव्हाण, भगवान रोहिदास चव्हाण, बालाजी नामदेव चव्हाण, अरविंद विनायक चव्हाण, सुरेश मच्छीराम राठोड, शांताबाई नामदेव चव्हाण, साहेबराव चव्हाण हे सर्व राहणार रोहिदास तांडा ता किनवट आणि शिरूर पवार राहणार वाघी , तालुका किनवट, अनिल भगवान चव्हाण सिरमेटी, महेश रमेश कोमलवार राहणार किनवट, संतोष कऱ्हाळे किनवट, बंडू सिंग राठोड व पुष्पाबाई बंडू सिंग राठोड राहणार लिंगी या सर्वांवर ॲट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हे किनवट पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दाखल केले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.

