वृषाली शेडमाकेची नवोदय विद्यालयात निवड; शाळा व्यवस्थापन समितीची निवड संपन्न

 



घाटंजी तालुका प्रतिनिधी निजामोद्दिन सोलंकी 

 जिल्हा परिषद शाळा, झटाळा येथील विद्यार्थिनी कुमारी वृषाली निलेश शेडमाके हिची इयत्ता सहावीकरिता नवोदय विद्यालय, बेलोरा येथे निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.

वृषाली हिने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. हनुमान राऊत सर तसेच शिक्षक माननीय श्री. विष्णू नेवारे सर, माननीय बीजेवार सर आणि माननीय श्री. माडवी सर यांनी तिचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याचवेळी जिल्हा परिषद शाळा, झटाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी श्री. निलेश देवाजी मसराम, तर उपाध्यक्षपदी सौ किरण आकाश मसराम यांची निवड करण्यात आली.

नवोदय विद्यालयात झालेली विद्यार्थिनीची निवड आणि शाळा व्यवस्थापन समितीची निवड यामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थिनीचे तसेच नवनिर्वाचित समितीचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post