सहा तास शोध मोहीम राबविल्यानंतर मृतदेह लागला हाती
मु पो गायवळ तालुका कारंजा लाड, जिल्हा वाशिम येथील भाविक माहूर गडावर आला होता परिक्रमा यात्रेसाठी
श्रीक्षेत्र माहूर :
माहूर गडावर दि 27 पासून सुरू झालेल्या नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी लाखो भावीक माहुर गडावर आले होते गायवळ ता कारंजा लाड जि वाशिम येथील भाविक अनिकेत वाल्मीक तूरक वय 28 वर्षे हे आपली बहीण व गावकऱ्यासोबत क्रूजर गाडीने माहूर गडावर आले होते परिक्रमा यात्रा पूर्ण करून आंघोळ करण्यासाठी मातृतिर्थ कुंडात पोहण्याचे उद्देशाने उडी मारली असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि 28 रोजी सकाळी 8.30 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे.
सदरील घटना कळल्याने तहसीलदार अभिजीत जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार भोंडवे ,नगराध्यक्ष फिरोज दोसानी ,मुख्याधिकारी विवेक कांदे ,पोलीस निरीक्षक देविदास चोपडे नायब तहसीलदार कैलास जेठे, तलाठी चंद्रकांत बाबर, विश्वस्त संजय काण्णव, यांचे सह सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी मातृतीर्थ कुंडाकडे धाव घेतली सकाळी 9 वाजता पासून दुपारी 3 वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती अथक परिश्रमानंतर दुपारी तीन वाजता त्यांचा मृतदेह हाती लागल्याने बाहेर काढून त्यांना ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी नेण्यात आले.
