विशेष प्रतिनिधी/प्रदिपकुमार सावते
श्री क्षेत्र माहूर : माहूर गडावर परिक्रमा यात्रा निमित्त लाखो भाविक दाखल झाले असून हे भाविक 27 देवांना देवस्थानावर जंगलातून जात 25 किमी ची यात्रा पूर्ण करणाऱ आहेत यानिमित्त ते तांदळा रस्त्यावरील जंगलाच्या बंदीतून सयामाय पहाडावर जाऊन सया मायेचे दर्शन घेणार असल्याने येथे भाविक प्रचंड थकून जातात त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन अनेक दारू विक्रेत्यांनी जंगलात इंग्लिश हातभट्टी दारू तसेच देशी दारू विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून दारू अड्डा उध्वस्त करून देशी दारू जप्त केली आहे
माहूर गडावर दि 26 रोजी पासून हजारो भाविक दाखल झाले होते परंपरेप्रमाणे परिक्रमा यात्रा सुरू झाली होती तर अनेक भाविक एक दिवस आधीच वेढा पूर्ण करून मुहूर्तावर श्री दत्त शिखर संस्थान येथे हजर राहतात दि 27 रोजी लाखो भाविक अनमाळ येथील सया माय पहाडावर उपस्थित राहून दर्शन घेत परतीच्या प्रवासाला लागतात त्यामुळे माळ चढण्यासाठी अनेक हौशी भाविक दारूचा सहारा घेतात त्यामुळे नेहमीप्रमाणे दारू विकणाऱ्यांनी इंग्लिश देशी दारू व हात भट्टी दारूची जमवा जमव केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी अचानकपणे धाड टाकून हजारो रुपयांची देशी दारू जप्त करून हातभट्टी दारू नष्ट केली आहे.
या कारभारीत उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नी देविदास चोपडे एपीआय शरद घोडके पो कॉ निलेश मोहरले, संघरत्न सोनसळे, रामा किरवले, पवन राऊत, बालू राठोड, पो,ना प्रकाश गेडाम, तसेच होमगार्ड राहुल राठोड शैलेश राठोड यांनी परिक्रमा सुरू असताना अनमाळ जंगलामध्ये अवैध व इंग्लिश दारूवर धाड मारून गुन्हा दाखल केला आहे.
मराठवाडा संपादक- अनिल बंगाळे
