तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परीषद प्राथमीक शाळा कोडशी (खुर्द) शाळेचा प्रथम क्रमांक

 

Chandrapur



प्रतिनिधी /संतोष मडावी 


कोरपना : राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत पंचायत समिती कोरपना यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी (खुर्द) यांनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.

सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत कोडशी (खुर्द) शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या प्रभावी लोकनृत्याने उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

या यशामध्ये कु. जीविका दुरुतकार, कु. आचल मोहजे, कु. प्रांजली वैरागडे, कु. गुंजन बोरडे, कु. धनश्री पायताडे आणि कु. समृद्धी तुमाने या विद्यार्थिनींचा सहभाग होता.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन व सराव करून घेण्यासाठी मुख्याध्यापक कैलाश मस्के तसेच शाळेच्या शिक्षिका कु. पुष्पा सोयाम, महेश राठोड आणि अशोक राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत शाळेचे नाव तालुकास्तरावर उज्ज्वल केले.

या यशाबद्दल विजेत्या विद्यार्थिनींचे, मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत कोडशी (खुर्द) शाळेची यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहो,” अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post