लोककलेच्या रंगात रंगले किनवट; ‘लोककलावंतांचा जागर’ उत्साहात संपन्न

 


#भिल्ल नृत्य, बंजारा लेंगी, गोंधळ, वासुदेव, भारूड अन् प्रबोधन गीतांनी रसिक मंत्रमुग्ध





किनवट : पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य), तालुका शाखा किनवटच्या वतीने कलावती गार्डन येथे आयोजित ‘लोककलावंतांचा जागर’ उत्साहपूर्ण आणि कलामय वातावरणात नुकताच संपन्न झाला. 

     “लोककला ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती समाजाच्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची जिवंत ओळख आहे,” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात आदिवासी भिल्ल नृत्य, ढेमसा नृत्य , बंजारा लेंगी नृत्य, भजन, गोंधळ, वासुदेव, भारूड, लोकगीते आणि प्रबोधन गीते अशा विविध लोककलांचे बहारदार सादरीकरण झाले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, लोकगीतांची सुरावट आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश यामुळे संपूर्ण परिसर कलामय झाला.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके होते. अमेरिकेतील कॉग्निझंट कंपनीचे सहसंचालक अभियंता सुधीर ढवळे, सुलेखा ढवळे, सिनेअभिनेते सुशांत प्रशांत ठमके, सिनेमॅटोग्राफर रुद्र पवार आणि तेलुगू अभिनेते प्रणव चिंटापटलावार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

     यावेळी सिनेअभिनेते डॉ. प्रमोद अंबाळकर आणि मंडळाचे संस्थापक त्रिरत्नकुमार मा. भवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य शुभांगीताई ठमके व उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी लोककलेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर विचार मांडले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष युवा नेते करणभाऊ एंड्रलवार यांनी ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक आयोजक तथा तालुकाध्यक्ष दिलीप गंगाराम मुनेश्वर यांनी केले, तर संयोजक विवेक मारोतराव ओंकार यांनी आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. याप्रसंगी प्रसिद्ध गायिका आम्रपाली वाठोरे यांनी स्वागत गीत , प्राचार्य सुरेश पाटील यांनी वामनदादांचं गीत व गायीका सुनिता कीर्तन यांनी प्रबोधन गीत गायिले .

     यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्माणीवार, आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, गायक आनंद कीर्तने, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, नगरसेवक अभय महाजन, प्रदेशाध्यक्ष रमेश गार्लेवाड, शाहीर बापूराव जमदाडे, गायिका सुनिता कीर्तने, शाहीर शंकरदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष अंकुश चित्ते, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम, जिल्हा सचिव शाहीर सुभाष गुंडेकर, वाशीम जिल्हाध्यक्ष सोनाली शरद खडसे, ह.भ.प. बालाजी पांचाळ, बेबीताई आठवले, शाहीर किसन मंत्री, शाहीर शिवाजी डोखळे, शाहीर शेषराव चव्हाण, पत्रकार गोकुळ भवरे , ऍड . मिर्लिद सर्पे , रविराज कानिंदे , किशन परेकार, कामराज माडपेल्लीवार , स. इम्रानअली  यांच्यासह अनेक मान्यवर, कलावंत व लोककलाप्रेमी उपस्थित होते.



    मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश शेवाळे, केशव केंद्रे, शाहीर दिलीप कोसले, मधुकर उमरे, संजय ठोके, बालाजी वाढवे, भीमराव पाटील, अनिल उमरे, राजेश धावारे, अशोक दवणे, गणपत वासाटे, पंकज भवरे, परसराम जाधव व हिरामण जाधव यांनी परिश्रम घेतले.

“लोककला जिवंत राहिली तर संस्कृती जिवंत राहते; संस्कृती जिवंत राहिली तर समाजाची ओळख चिरंतन राहते,” या संदेशाने लोककलेच्या संवर्धनाचा आणि पुढील पिढीपर्यंत तिचा समृद्ध वारसा पोहोचविण्याचा संकल्प या मेळाव्यातून अधोरेखित झाला.

Post a Comment

Previous Post Next Post