आर्णीचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांची श्री दत्त मठ संस्थानला सदिच्छा भेट
भाविकांच्या सुविधांसाठी २५ लाख रुपयांचे काम दान देण्याची घोषणा; गुरुवर्य श्री संत शहापुरी महाराज यांचे घेतले आशीर्वाद
ब्रम्हपुरी झटाळा फाटा | प्रतिनिधी
आर्णी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी ब्रम्हपुरी झटाळा फाटा येथील श्री दत्त मठ संस्थानला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गुरुवर्य श्री संत शहापुरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी मठात येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांच्या उभारणीसाठी २५ लाख रुपयांचे काम दान देण्याची घोषणा आमदार तोडसाम यांनी केली. भाविकांची सेवा हीच दत्तप्रभूंची सेवा या भावनेतून त्यांनी केलेल्या या योगदानाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या सेवाभावी योगदानाबद्दल श्री दत्त मठ संस्थानच्या विश्वस्त समितीच्या वतीने आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, श्री दत्त महाराजांच्या कृपेने आमदार राजूभाऊ तोडसाम यांना सदैव यश, सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभावे तसेच गुरुवर्य श्री संत शहापुरी महाराज यांचे शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

