तालुका प्रतिनिधी| निजामोद्दिन सोलंकी
जरंग : जिल्हा परिषद शाळा, जरंग येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञानदीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक देविदास हेमके, शिक्षक संजय जाधव व मेश्राम सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन खुरसाने, उपाध्यक्ष विजय आडे यांच्यासह सदस्य शुभांगी लेनगुरे, संगीता लेनगुरे, मेघा तोडसाम, माधुरी ठाकरे, अमोल आगरकर, सचिन लेनगुरे, राजू पवार, गजानन चौधरी, अनिल आडे व नारायण सोनुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी रुचिका संतोष डबूरकर हिने केले. यावेळी लावण्या खुरसाने, वैष्णवी चौधरी, अवनी पिदूरकर, वेदिका गाऊत्रे, भाविका ढवस, रिया लेनगुरे व नित्यश्री ठाकरे यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणे व मनोगते व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांची वेशभूषा धारण करून त्यांच्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले. महापुरुषांचे विचार, कार्य आणि समाजासाठीचे योगदान विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर मांडले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.
