वानोळा येथे अंजली क्लिनिकचे थाटात उद्घाटन




 


 Nanded: माहूर तालुक्यातील वानोळा येथे डॉक्टर पृथ्वीराज वसंत चव्हाण यांनी परमपूज्य परमेश्वर महाराज यांचे शुभहस्ते व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंजली क्लिनिकचे थाटात उद्घाटन केले आहे. परिसरातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळावी या हेतूने अंजली क्लिनिक सुरू केले आहे. यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये गावचे उपसरपंच अभिजीत राठोड, 



तंटामुक्त अध्यक्ष शंकर आडे, ग्रामपंचायत सदस्य सुदाम चव्हाण,गावाकडची बातमी न्यूज चॅनलचे जिल्हा विशेष प्रतिनिधी तथा पत्रकार पंडित धुप्पे,युवा नेते विशाल मोहिते, गावचे नाईक दुधराम राठोड, सेवानिवृत्त शिक्षक विष्णुपुरीकर, जयसिंग चव्हाण,दामोधर धुप्पे,विभुते, वसंत चव्हाण,यांचे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित गावकऱ्यांनी सेवानिवृत्त वन कर्मचारी तथा डॉक्टरचे वडील वसंत चव्हाण आणि डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर उपस्थिताचे डॉक्टर चव्हाण यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post