किनवट : मौजे माळबोरगाव, ता. किनवट, जि. नांदेड येथे श्री महादेव यात्रा निमित्ताने कबड्डीचे खुले सामने आयोजित करण्यात आले आहेत. दि. ११ ते १४ सप्टेंबर २०२६ दरम्यान महादेव मंदिर परिसरात ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेच्या प्रारंभी दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता महादेवाचा अभिषेक श्री शिवकांत महाराज मारावगाव (खालचे) यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर कबड्डीच्या सामन्यांना सुरुवात होईल. ‘एक गाव, एक संघ’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विविध संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत :
🥇 प्रथम क्रमांक – ₹२५,००१
मा. खा. नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली लोकसभा मतदारसंघ यांच्या कडून.
🥈 द्वितीय क्रमांक – ₹२१,००१
मा. आ. भीमराव रामजी केराम, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघ यांच्या कडून.
🥉 तृतीय क्रमांक – ₹१५,००१
प्रा. विजय खुपसे सर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, जि. नांदेड यांच्या कडून.
🏆 चतुर्थ क्रमांक – ₹११,००१
ग्रामपंचायत कार्यालय, माळबोरगाव यांच्या कडून
या स्पर्धेचे उद्घाटक सामाजिक व वेदकीय क्षेत्रातले मराठवाडा रत्न पुरस्कार प्राप्त डॉ. पुंडलिक गोमाजी आमले असून, स्पर्धेचे अध्यक्ष माधव आंधुरे, उपाध्यक्ष विजय कापसे, सचिव प्रकाश राठोड, उपसचिव दिलीप पवार, कोषाध्यक्ष विजय जाधव, सहकोषाध्यक्ष नामदेव आत्राम तसेच सदस्य धनराज बोईनवाड व मानिक मडावी आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ७०१ रुपये, तर लेट फी १००१ रुपये ठेवण्यात आली आहे. या भव्य स्पर्धेचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, माळबोरगाव (शांतापूर, महादेव तांडा, पितांबरवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे. कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


