श्री दत्त शिखर संस्थान प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या घराचे कुलूप काढेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे घराला कुलूप लावल्या गेल्याने येथील संत चिंतामण भारती महाराजांनी कालपासून अन्न पाणी आंदोलन सुरू केले असून 24 तास उलटूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सह धर्मादाय कार्यालय विश्वस्तांनी त्यांच्या घराला लावलेले कुलूप काढून केलेल्या तक्रारीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली असून त्यांचे वडील त्यांनी हे पोलीस ठाण्यात तक्रार देऊन माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत नमूद केल्याने भक्तगण द्विधा मनस्थितीत आलेले आहे दखल घेऊन तातडीने चौकशी व आवश्यक कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले असून चिंतामण भारती महाराजांच्या वडिलांनी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचे लेखी दिले आहे
४८ तास उलटूनही उपोषणाची दखल नाही!
परमपूज्य चिंतामणी भारती महाराज यांच्या उपोषणाला ४८ तास पूर्ण झाले, तरीही प्रशासन, विश्वस्त मंडळ किंवा संबंधित ट्रस्टींकडून या गंभीर प्रकरणाची अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. महाराजांच्या राहत्या घराला बेकायदेशीररीत्या सील ठोकून, शासनशाहीचा वापर करून त्यांना त्यांच्या निवासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अद्याप हे सीलही काढण्यात आलेले नाही.


