विभागीय संपादक निलेश रामगावकर
अमरावती/ तळेगाव दशासर स्थानिक तळेगाव दशासर येथील लिटिल लोटस इंग्लिश स्कूलमध्ये बैलपोळा निमित्त सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ विजया ज्ञानेश्वरराव धाडसे ठाणे व प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर धाडसे उत्तमराव पुसतकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती सतीश ढाकुलकर मॅडम उपस्थित होते पर्यावरणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सुंदर असे मातीचे बैल बनवले आपल्या हिंदू संस्कृतीत बैलपोळा हा अतिशय महत्त्वाचा सण आहे वर्षभर शेतात राबवून आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या बैलांचे ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न म्हणजे बैलपोळा होय संस्कृतीचे जतन संवर्धन करणे हा प्रमुख उद्देश होता तसेच मातीचे महत्व पटवून देण्याकरिता मातीचे बैल बनवून आणणे हा त्यामागचा उद्देश होता. व विद्यार्थ्यांनी तो यशस्वीरित्या पार पडला चिमुकल्या विद्यार्थ्यांना बैलपोळ्याचे महत्त्व पटवून देण्यात आले कृषिप्रधान असलेल्या भारतात शेतकऱ्यांचा खरा मित्र बैल असतो हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले कार्यक्रमाचे संचालन. सौ रुपाली बुधे मॅडम व आभार प्रदर्शन मयुरी मेश्राम मॅडम यांनी पार पाडले महत्वाचे म्हणजे बैल सजावटी करिता पालकांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सहकार्य केले व त्यांचा आनंद द्विगुणित केला विशेष सहकार्य आचल शिंदे हिने केले . बैल सजावट स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेता रियांश पवन देवढकले क्लास केजी_1, द्वितीय पारितोषिक सर्वेश विशाल मुटकरे क्लास नर्सरी, तृतीय पारितोषिक सान्वी शुभम ढवळे केजी -1.तर सर्वोत्कृष्ट पारितोषिक सार्थक हरेश्र्वर मुत्करे kg1 क्लास या विद्यार्थ्याने पटकावले.
