सिंदखेड येथे वंदे मातरम गणेश मंडळातर्फे गणपतीची स्थापना

 




 


माहूर तालुक्यातील सिंदखेड येथे वंदे मातरम गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेशाची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. गणपती स्थापना कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गणेश मंडळातर्फे राम सेतूचे आकर्षक प्रदर्शन उभारण्यात आले असून, हे प्रदर्शन भाविक व नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. राम सेतूची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता दिसून येत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post