बंद घर फोडून चोरी करणारा २४ तासांत जेरबंद; ४५ हजारांचे दागिने जप्त

 




यवतमाळ,घाटंजी : केळापूर तांडा येथे बंद घराचे कुलूप व साखळी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला घाटंजी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आकाश विठ्ठल चव्हाण (२७), रा. केळापूर तांडा, याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

१७ सप्टेंबर रोजी दशरथ रामजी जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्याची पोत, सोन्याच्या पाळ्या व रोख रक्कम असा सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तक्रारीनंतर घाटंजी पोलिसांनी तपास सुरू करून आकाश चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपीकडून ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व १५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाळ्या असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड व पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post