विभागीय संपादक /निलेश रामगावकर
अमरावती/ घुईखेड : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी मोरया प्रतिष्ठान ट्रस्ट, घुईखेड यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पोलीस भरती स्पर्धा परीक्षा पेपर आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरावाची संधी उपलब्ध होणार आहे.
ही परीक्षा सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत घेण्यात आली. परीक्षेचे ठिकाण मोरया प्रतिष्ठान ट्रस्ट, घुईखेड असे आहे. या परीक्षेत पुरुष गट व महिला गट अशा स्वतंत्र स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष गटातील पारितोषिके
पुरुष गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार १ रुपये, तर तृतीय क्रमांकास १ हजार १ रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.
महिला गटातील पारितोषिके
महिला गटात प्रथम क्रमांकासाठी ३ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार १ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार १ रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी प्रवेश शुल्क केवळ ३१ रुपये ठेवण्यात आले होते.
या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवक-युवतींना पोलीस भरतीच्या परीक्षेचा प्रत्यक्ष सराव, वेळेचे नियोजन आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करण्याची संधी मिळणार आहे. “सर्व स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोरया प्रतिष्ठान ट्रस्ट, घुईखेड यांच्या वतीने पोलीस परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

