घाटंजी – ग्रामीण तालुका प्रतिनिधी शुभम मेश्राम
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्ली व सावळी (सदोबा) येथे पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या या रूटमार्चदरम्यान कुर्ली येथील आठवडी बाजार परिसर, जामा मशीद, बसस्थानक चौक तसेच मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आले. त्यानंतर सावळी (सदोबा) गावातील प्रमुख मार्गावरही रूटमार्च काढण्यात आला.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी हा रूटमार्च आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पारवा पोलीस ठाण्याचे ३ अधिकारी, २० पोलीस कर्मचारी व २० होमगार्ड सहभागी झाले होते. रूटमार्चला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Tags
Yavatmal Maharashtra

