चिखली खुर्द येथे १४५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी


 




किनवट : जय हनुमान गणेश मंडळ व नागेश देवतळे मित्र परिवाराच्या वतीने चिखली खुर्द येथे २१ सप्टेंबर रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात १४५ रुग्णांची मोफत तपासणी व रोगनिदान करण्यात आले.

कॅन्सर, हृदयरोग, डायलेसिस, क्रिटिकल केअर, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग शस्त्रक्रिया व ENT अशा विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. पात्र रुग्णांना साने गुरुजी रुग्णालय, किनवट व कोठारी येथे शासकीय योजनेअंतर्गत पुढील उपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

डॉ. विजय काळे, डॉ. शिवणी बेलखोडे, डॉ. अश्विनी यांच्यासह वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जय हनुमान गणेश मंडळ, नागेश देवतळे मित्र परिवार व ग्रामस्थांनी सहकार्य केले. उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post