माहूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी अॅड. माज बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांच्या हस्ते माहूर येथे अॅड. बडगुजर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासोबतच भाजपची विचारधारा तसेच वरिष्ठ नेत्यांचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अॅड. माज बडगुजर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनीलजी राणे, भाजपा सहसंपर्कप्रमुख (मराठवाडा) नितीनजी काळे, आमदार भीमरावजी केराम, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश संयोजक सुधाकर भोयर, भाजपा मंडळ अध्यक्ष उमाकांत कराळे, स्वागत आयनेनीवार, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अॅड. नैतिक नाईक, संध्या राठोड, नगरसेवक गोप महामने, संतोष मरसकोल्हे आणि नीलकंठ मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियुक्तीनंतर अॅड. माज बडगुजर यांनी आमदार भीमरावजी केराम, भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. अल्पसंख्याक समाजासह सर्व घटकांना पक्षाच्या संघटनेशी जोडण्यासाठी आणि पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

