सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नेर येथे भव्य निषेध आंदोलन व मोर्चा आज

 


यवतमाळ | प्रतिनिधी

ज्येष्ठ अभियंता व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना कथितरित्या हुकूमशाही पद्धतीने ताब्यात घेतल्याच्या घटनेचा तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी नेर येथे भव्य निषेध आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, आंबेडकर चौक, नेर येथे होणार असून विविध सामाजिक, विद्यार्थी आणि लोकशाहीवादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


आंदोलनादरम्यान खालील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत:


- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

- NEET पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

- महाराष्ट्रातील TET पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

- विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे सरकारने तात्काळ थांबवावे.

आयोजकांनी समस्त लोकशाही, संविधान आणि देशप्रेमी नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post