Amaravati | बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी कृषी सहसंचालकांची भेट; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत आढावा

 

Maharashtra India



जिल्हा प्रतिनिधी | निलेश रामगावकर
अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या शिष्टमंडळाने कृषी सहसंचालक, अमरावती विभाग यांची भेट घेऊन बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात कृषी विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला.

यावेळी बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

या प्रसंगी सुनील राणा, प्रकाश साबळे, मंगेश इंगोले, राहुल तायडे आदी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post