घाटंजी : तालुक्यातील कुर्ली परीसरात जून महीन्याच्या शेवटच्या आठवड्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांनी कापूस सोयाबिन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली पिकेही उगवली यामुळे शेतकरी आनंदात होते.मात्र गेल्या काही गेल्या आठवड्याभरापासून पावसाने हुलकावनी दिल्याने कोवळे पिके माना टाकू लागल्याने शेतकरी चिंतेत भर पडली आहे येत्या दोन तिन दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास पिके करपून जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे.
परीसरात अद्यापही दमदार पाऊस बरसला नसल्याने अद्यापही नदी नाले कोरडेच असून जमीनीत ओलावा नसल्याने हलक्या जमीनीतील पिके शेतक-यांच्या डोळ्या देखत करपून जात असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे पावसाने उघडीप देताच पिकातील मशागतीच्या कामांना वेग आला डवरणी खुरपनी खते फवारणीचे कामे शेतक-यांनी उरकून घेतली मात्र आता पिकांना पावसाची नितांत गरजअसल्याने शेतक-यांच्या नजरा आभाळाकडे लागले आहे. मात्र सध्या तरी हवामान ढगाळ नसल्याने पावसाची अपेक्षा कमी असल्याचे दिसत आहे हवामान विभागाकडून काही दिवस पाऊस उघडीप घेणार असल्याचे अंदाज वर्तवला जात असल्याने पुन्हा शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतमजूरांच्या हाताला काम नसल्याने शेतक-यासह शेतमजूरही सध्या पावसाची वाट पाहत आहे.

