तालुका प्रतिनिधी - निजामोद्दिन सोलंकी,
सह तालुका ग्रामीण प्रतिनिधी शुभम मेश्राम
यवतमाळ,घाटंजी : स्थानिक एकता महिला मंडळच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे हे २८ वे यशस्वी वर्ष होते इयत्ता १० वी तील अक्षताअनिल रामटेके तसेच इयत्ता १२ वी तील तन्वी नामदेव वारकड, वैष्णवी सुनील ठाकरे, भाग्यश्री दिलीप सासनवार व ऐश्वर्या राजेश अग्रवाल या विद्यार्थिनी सत्काराच्या मानकरी ठरल्या चैताली सुदर्शन कोवे, वालिका चव्हाण, मनस्वी राजू बच्चूवार व कार्तिकी डेहनकर या विद्यार्थिनींनाही बक्षिसे देण्यात आली. मारावार व यमसनवार परिवार, वैशाली वाघ, सरिता बुक्कावार ,सुनीता बेलोरकर ,किरण दुगड, चंचलदेवी मुणोत, संगीता ठाकरे, सोनल ठाकरे, ज्योती पामपट्टीवार, विजया पामपट्टीवार, मंगला भोयर, भाग्यश्री कोमावार , शालिनी पामपट्टीवार ,
माया यमसनवार, सुरेखा किडे, पुष्पा नामपेल्लीवार यांचे तर्फे बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्योती शितल वातीले ह्या लाभल्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा ठाकरे होत्या. तसेच मंचावर अध्यक्षा माया यमसनवार, उपाध्यक्षा संगीता भुरे व सचिव साधना ठाकरे विराजमान होत्या.
यासोबतच मंडळातील सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वर्षां माडुरवार व स्वप्नाली भास्करवार यांनी केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैष्णवी पालकृतवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंडळाच्या अध्यक्षा समस्त कार्यकारिणी तसेच साक्षी बेलोरकर दर्शना अवचित मेघा गोमेकर स्मिता मानकर, पुजा उत्तरवार यांनी प्रयत्न केले गुणवंत विद्यार्थिनींना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . अतिशय प्रसन्न अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

