श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे सतीगुडा येथील गट क्र. २५ या सरकारी गायरान जमिनीत विजय शामराव राठोड व अमोल सोमला राठोड यांनी अंदाजे १५-२० एक्कर जमीनीवर अनधिकृतपणे विहीर खोदून अतिक्रमण केल्याचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या दि. २५/०६/२०२६ रोजीच्या चौकशी अहवालात निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे महसूल प्रशासनाने अद्याप कोणतीही दंडात्मक किंवा अतिक्रमण निष्कासनाची कारवाई केलेली नाही त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी मौजे सतीगुडाचे सामाजिक कार्यकर्ते खुशाल टी राठोड यांचे सह गावकऱ्यांनी माहूरच्या तहसील कार्यालयासमोर दि 28 रोजी 12 वाजता उपोषण सुरू केले आह
दिलेल्या निवेदनाप्रमाणे गायरान जमिनीचे रक्षण करण्याची वैधानिक जबाबदारी महसूल व ग्रामपंचायतीची असताना सतीगुडा ग्रामपंचायत जाणीवपूर्वक आणि संगनमताने मोजणी शुल्क भरण्यास टाळाटाळ करत आहे ग्रामपंचायतीकडे निधी नाहीं' हे अत्यंत तकलादू व खोटे कारण पुढे करून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्याचा कुटील डाव ग्रामपंचायत व ग्रामसेवक खेळत आहेत.
अतिक्रमण सिद्ध झालेले असताना केवळ मोजणी शुल्क या एका तांत्रिक कारणास्तव तहसील कार्यालय पंचायत समिती आणि भूमी अभिलेख विभाग एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत आहेत. शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी केवळ पैशाचे कारण देणे हे उच्च न्यायालयाच्या गायरान अतिक्रमण विरोधी कडक निर्देशांचा आणि आदेशांचा थेट अवमान करणारे आहे असे त्यांनी निवेदनात नमूद करून दि 28 रोजी 12 वाजेपासून माहूरच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.


