वृद्धांना आधार काठी वाटप, भव्य वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

 



जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 


अमरावती/ अंजनसिंगी   दि. २७ जुलै २०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रेरणेने तसेच कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनसिंगी येथील श्री साईबाबा विद्यालयात सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.



कर्मयोगी फाउंडेशन अमरावती जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात वृद्ध व्यक्तींना आधार काठीचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि करिअरच्या संधी याविषयी प्रा. संजय नाथे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा उत्स्फूर्त लाभ घेतला.


कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.



या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजीव निस्ताने, कर्मयोगी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तितरे, तालुका अध्यक्ष स्वप्निल  भापकर, उपाध्यक्ष विशाल ठाकरे तसेच अमरावती जिल्हा व धामणगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक प्रबोधन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post