विशेष प्रतिनिधी| सुनिल धुर्वे
यवतमाळ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा व कोलाम समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पावनभूमी क्रांतिवीर शामादादा कोलाम प्रेरणास्थळ, निरंजन माहूर, दत्तापूर, ता. कळंब, जि. यवतमाळ येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. संजय राठोड, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. संजयभाऊ देशमुख, तसेच आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रा. डॉ. अशोक उईके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय आमदार राजुभाऊ तोडसाम, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना (भा.प्र.से.), सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रवैय्या डोंगरे (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक कुमार चिंता, तहसीलदार धिरज स्थुल, गटविकास अधिकारी अजय चव्हाण, ठाणेदार धनराज निळे, दत्तापूरचे सरपंच प्रदीप झोटींग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ, तसेच माजी सैनिक सुभेदार मेजर माधवराव टेकाम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास समस्त आदिम जमात कोलाम समाज, आदिवासी बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
