संपादकीय लेख | "जनतंत्रवरची गर्दी पाहून 1947 चे युद्ध आठवले"

 



संपादकीय "जनतंत्रवरची गर्दी पाहून 1947 चे युद्ध आठवले"

_सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी_


ज्यांनी 1947 चे युद्ध पाहिले नाही, त्यांना आज दिल्लीच्या जनतंत्रवर दिसणारी गर्दी पाहून ते जाणवत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि नागरिक पहिल्यांदा जनतंत्रवर आले आहेत. 


सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण आणि CJP चे आंदोलन हे फक्त लडाख किंवा शिक्षणापुरते राहिलेले नाही. ही आता `दुसरी स्वातंत्र्य लढाई` बनली आहे.


1947 मध्ये इंग्रजांनी भारत सहज सोडला नव्हता. तुरुंग, लाठीचार्ज, उपोषण सगळे सहन करावे लागले होते. आजही तेच चित्र आहे. फरक एवढाच की आता इंग्रज नाहीत, तर `मात्रालयातील खिसे कापू` आहेत. जे शिक्षण विकतात, जमिनी विकतात, आणि जनतेच्या हक्कावर डल्ला मारतात.


आज जनतंत्रवर उभा असलेला प्रत्येक विद्यार्थी सांगतोय - "शिक्षण मंत्री राजीनामा द्या". प्रत्येक नागरिक सांगतोय - "6 वी अनुसूची लागू करा". 


*आता वेळ आली आहे जागृत होण्याची.*  

1947 ची लढाई दिल्लीत लढली गेली. 2026 ची लढाई प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात लढावी लागेल.


मालेगाव पासून सुरुवात करा. कोकणापासून सुरुवात करा. तुमच्या ठिकाणापासून हक्काची लढाई सुरू करा. 


कारण झेंडा 1947 ला मिळाला, पण स्वातंत्र्य आजही अपूर्ण आहे.



      लेखक: कैलास आत्मराम बनसोड मालेगाव


Post a Comment

Previous Post Next Post