महाराष्ट्र
घाटंजी : वाढदिवस हा केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याच्या उद्देशाने घाटंजी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा तसेच "एक व्यक्ती – एक झाड" हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
यावेळी निसर्ग पूजक बहुउद्देशीय संस्था, व संस्थेचे अध्यक्ष तथा आदिवासी टायगर सेना, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बंडू तोडसाम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "झाडे हीच पृथ्वीची खरी संपत्ती आहेत. झाडांमुळे आपल्याला प्राणवायू (ऑक्सिजन) मिळतो, पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि भावी पिढ्यांचे जीवन सुरक्षित राहते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा."
यावेळी लावण्यात आलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करावी, असे आवाहनही बंडू तोडसाम यांनी केले.
या उपक्रमामुळे वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली असून पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजय बैस, रमेश धुर्वे माजी उपसभापती पं. स. घाटंजी, बाळूभाऊ जाधव,विनय जाधव,नंदकिशोर डंभारे संचालक कृ. उ. बाजार समिती घाटंजी,रत्नाकर गावंडे अरविंद जाधव, नरेश पेंदोर, निसर्ग पूजक संस्थेचे सचिव,श्रीराम मेश्राम, अमोल गेडाम, प्रदीप ठोंबरे, युवा अध्यक्ष,महेश जाधव, बचू चिवाने,सुधाकर कोहचाडे , मीराबाई किनाके सह शेकडो शुभचिंतक आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

