गुंज–सवना–कलगाव मार्गाच्या रखडलेल्या कामासाठी ग्रामस्थ आक्रमक



श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 


महागांव :-सवना, गुंज व कलगाव येथील ग्रामस्त 

, कलगाव ते गुंज हा प्रमुख मार्ग मागील दहा वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्याचे नूतनीकरण झालेले नाही. हा रस्ता तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असूनही तो सातत्याने दुर्लक्षित होत आहे.

यापूर्वी अनेक वेळा संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र कायमस्वरुपी रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही.

या मार्गावर साखर कारखाना, सूतगिरणी, आयटीआय महावि‌द्यालय, इतर शैक्षणिक संस्था, ग्रामीण रुग्णालय तसेच अनेक महत्वाची कार्यालये आहेत. दररोज हजारो नागरिक, वि‌द्यार्थी, शेतकरी व रुग्ण या मार्गाने प्रवास करतात. गंभीर रुग्णांना उपचारासाठी पुसद येथे नेताना रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा महिलांची प्रसूती रस्त्याने झाली. असंख्य अपघात सुद्धा झाले 

लोकप्रतिनिधी निष्क्रियतेमुळे प्रशासनने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागास आवश्यक सूचना देऊन कलगाव-गुंज रस्त्याचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करण्यात यावे, 

अन्यथा, हे निवेदन सादर केल्यानंतर आठ दिवसांच्या आत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास, आम्ही सर्व ग्रामस्थ लोकशाही मार्गाने बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यास बाध्य राहू. या आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील. अशी ठाम भूमिका

गुंज सवना कलगाव वाकोडी येथील नागरिकांनी घेतील. 

यावेळी महागाव तहसीलदार यांना लेखी निवेदन

 देण्यात आले निवेदन देण्यासाठी किसान आघाडी महागाव तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव आबासाहेब देशमुख गोविंदराव देशमुख ,, सतीश खाडे आकाश सोळंके ,किरण जाधव किसनराव नरवाडे ,किसनराव सुरोशे, सतीश खाडे पाईकराव, निकम व ऑटो संघटनेचे सर्व पदाधिकारी व चालक

सवना, गुंज, कलगाव, वेणी, वाकोडी येथील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.


"गुंज–सवना–कलगाव रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व खड्ड्यांमुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने यापुढे विलंब न करता रस्त्याचे काम तातडीने सुरू करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल,"

जगदीश नरवाडे (जन आंदोलन आधार संघर्ष समिती अध्यक्ष )

Post a Comment

Previous Post Next Post