दादर येथे 'छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026' ने गायक अभिमान गायकवाड यांचा सन्मान

 


Village news network


मुंबई : दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात मुंबईचे सुप्रसिद्ध समाजप्रबोधनपर गायक अभिमान गायकवाड यांना "छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026" प्रदान करून गौरविण्यात आले.

हा मानाचा पुरस्कार सुधाकर सुराडकर (अध्यक्ष, स्वराज्य प्रतिष्ठान) तसेच समाजसेवक प्रमोद आप्पा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिमान गायकवाड यांनी स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आयोजक आणि उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. या सन्मानामुळे समाजप्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची प्रेरणा अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही सामाजिक जाणीव जागृत करणारी गीते सादर करून समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून गायक अभिमान गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post