मराठवाडा संपादक- अनिल बंगाळे
माहूर, दि. 29 जून 2026 : भारत निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्रात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, त्याअनुषंगाने आज माहूर तहसील कार्यालयात बीएलओ, पर्यवेक्षक, सहाय्यक व ऑपरेटर यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी बी. सरवनन होते. त्यांनी उपस्थित बीएलओंकडून विशेष सखोल पुनरीक्षणाचे कामकाज कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे, याबाबत सविस्तर माहिती घेतली.
यावेळी प्रत्येक मतदाराच्या जन्मतारखेची नोंद, आई किंवा वडिलांचे नाव, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक हे तपशील Enumeration Form मध्ये अचूकपणे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व बीएलओंनी निर्धारित कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
याप्रसंगी नागरिकांनीही बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
बैठकीस तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अभिजीत जगताप, निवडणूक नायब तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी के. के. जेठे, निवासी नायब तहसीलदार अरुणा सुर्यवंशी, मुख्याधिकारी, नगर पंचायत माहूर तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी विवेक कांदे यांच्यासह तालुक्यातील सर्व बीएलओ, पर्यवेक्षक, सहाय्यक व ऑपरेटर उपस्थित होते.
