माहूर घाटातील दरीत टेम्पो कोसळला ; यवतमाळच्या तीन भाविकांचा मृत्यू

 


टेम्पोच्या केबिन मध्ये बसलेले तिघेजण बचावले तर मागील डाल्यात बसलेल्या तिघांचा मृत्यू




माहूर गडावर नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने देशभरातून भाविक मिळेल त्या वाहनाने गडावर येऊन दर्शन घेत आहेत यवतमाळ येथील सहा भाविक टेम्पो द्वारे दि 15 रोजी रात्री 12.00 वाजता माहूर येथे पोहोचले त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन परत यवतमाळ येथे जात असताना माहूर घाटातील पहिल्या घातक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा उजेड डोळ्यावर पडल्याने चालकाचा तोल जाऊन टेम्पो थेट 100 खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात टेम्पोतील मागील डाल्यात बसलेले तिघेजण खोलदरीत दगडावर आदळल्याने त्यांच्या डोक्यांना व इतर अवयवांना गंभीर दुखापती झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला चालकासह केबिनमध्ये बसलेल्या इतर दोघांना किरकोळ मार लागल्याची घटना दि 16 रोजी सकाळी 5.00 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे .

यवतमाळ येथील बोरा डिजिटल आय एफ बी पॉईंट अप्सरा टाकीज जवळ यवतमाळ येथील सहा कामगार दुकानदाराचा मॅक्झिमो जितो हा छोटा टेम्पो क्र MH29 BE 6859 ने दि 15 रोजी रेणुका देवी येथे रात्री 10.30 ते अकराच्या दरम्यान निघाले माहूर गडावर बारा वाजता पोहोचून दर्शन आणि येथील कार्यक्रम आटोपून ते सकाळी पाच वाजता परत निघाले सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या मागील पहिल्या घातक वळणावरुन जात असताना समोरून वाहनाचा उजेड पडल्याने तसेच समोरचे वाहन विरुद्ध दिशेने आल्याने चालकाने मोकळ्या जागेत टेम्पो वळवला परंतु बॅलन्स बिघडल्याने थेट वळणाच्या किनाऱ्यावर कठडे संरक्षक भिंत नसल्याने शंभर फूट खोल दरीत जाऊन कोसळला.

 झालेल्या अपघातात चालक प्रतीक अरविंद अडकिने वय 26 वर्ष व इतर दोघे दत्ता मनोहर मेश्राम वय 35 यशवंत अरविंद पाटील वय 25 तिघे राहणारे यवतमाळ यांना किरकोळ मार लागला तर टेम्पोच्या मागे डाल्यात बसलेले तिघे बाबाराव ज्ञानोबा टेकाम वाय 60 वर्षे राहुल सुधाकरराव ठाकरे वाय 25 वर्षे प्रीतम रामराव प्रधान व 38 वर्ष तिघे राहणार यवतमाळ हे उसळून दगडावर आदळले गेल्याने तसेच त्यांचे अंगावर दगड आणि टेम्पो पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर अवस्थेत होता सदरील माहिती भाविकांनी 112 वर सांगितल्याने गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे पोका पवन राऊत यांना कळविल्याने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन 4 जखमींना उपस्थितांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले येथे उपचार सुरू असताना बाबाराव टेकाम यांचा मृत्यू झाला तर दोघांचे शव तेथेच पडून होते पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी पत्रकार इलियास बावाणी पत्रकार गोपाल चव्हाण यांच्या मदतीने दोन्ही शव वर काढून ग्रामीण रुग्णालयात पोहचवले तर शारदा कंट्रक्शन चे सुपरवायझर श्रीनिवास यांनी तात्काळ क्रेन उपलब्ध करून दिल्याने टेम्पो बाहेर काढण्यात आला आहे.

एका जखमीचा ग्रामीण रुग्णाल मृत्यू झाल्याचे डॉ बिपिन बाभळे यांनी जाहीर केल्याने अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे यावेळी रुग्णालयाच्या आधीपरिचारिका एसबी बोथिंगे दत्ता पालटवाड एस कुंठेकर आर श्रीमंगले पी आर जुडे जीआर भोपाळे अमृता कऱ्हाळे गणेश धुळगंडे यांचे सह 108 च्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ सेवा देत जखमींवर उपचार करून शवविच्छेदन केले .

उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके पोहेका सत्यमल मडावी पोका संघरत्न सोनसळे पोका पवन राऊत होमगार्ड एस पी भगत मुरकुटे यांच्यासह पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post