मेळघाटातील कोरकू समाजाचा इतिहास, संस्कृती आणि लोकजीवनावर 'लोकजागर'मध्ये विशेष मुलाखत

 





मेळघाटातील कोरकू समाजाचा इतिहास, संस्कृती आणि लोकजीवनावर 'लोकजागर'मध्ये विशेष मुलाखत


अमरावती, दि. २ जुलै : आकाशवाणी अमरावतीच्या 'लोकजागर' या विशेष कार्यक्रमामध्ये मेळघाटातील कोरकू समाजाचा इतिहास, संस्कृती, भाषा, परंपरा, सण-उत्सव आणि लोकजीवन या विषयावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावस्कर यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

ही मुलाखत नितीन भट यांनी घेतली असून कार्यक्रमाचे सादरीकरण आशिष गावंडे यांनी केले आहे. कोरकू समाजाची सांस्कृतिक परंपरा, सामाजिक जीवन, भाषिक वैशिष्ट्ये तसेच मेळघाटातील आदिवासी वारशाविषयी महत्त्वपूर्ण माहिती या मुलाखतीतून श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.


हा कार्यक्रम रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी अमरावतीच्या एफएम १०१.५ मेगाहर्ट्झवर प्रसारित होणार आहे. तसेच हा कार्यक्रम News On Air ॲपवरही उपलब्ध राहणार आहे.

मेळघाट आणि कोरकू समाजाच्या इतिहास, संस्कृती व परंपरांविषयी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या श्रोत्यांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी अमरावतीतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post