निधन वार्ता -बतुलबी सोलन्की यांचे निधन

 



बतुलबी सोलन्की यांचे निधन


यवतमाळ मार्मिक घाटंजी

तालुक्यातील कुर्ली येथील दैनिक जनमत व पोलीसनामा दैनिकाचे घाटंजी वार्ताहर अयनुद्दीन सोलन्की यांच्या मातोश्री बतुलबी शमसुद्दीन सोलन्की (वय 80) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बतुलबी सोलन्की यांच्या पश्चात अयनुद्दीन सोलन्की, फयजुद्दीन सोलन्की, हनिफोद्दीन सोलन्की, निजामोद्दीन सोलन्की व दोन बहीणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. बतुलबी सोलन्की वर कुर्ली येथील मुस्लीम स्मशानभुमीत अन्त्यसस्कार करण्यात आले. या वेळी पाटणबोरी येथील तालीमुल कुरआन दारुल उलूमचे मौलाना शेख अय्युब इशाती, मौलाना शरफोद्दीन मलनस (किनवट), मौलाना सलीम, मौलाना निसार, यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मुबारक तन्वर या सह शेकडो नागरिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post