जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
धामणगाव रेल्वे :- दि. २६ : राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला...
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचेप्राचार्य प्रशांत शेंडे व उपप्राचार्य प्रमोद हातेकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले. पर्यवेक्षक नरेश कावलकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय, समता व लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी विद्यालयात दि. १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली...
या कार्यक्रमास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
