माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाची कार्यशाळा उत्साहात संपन्न

 




जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर

धामणगाव रेल्वे : महाराष्ट्र शासनाच्या 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली.

कार्यशाळेला डॉ. प्रफुल भोरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. विवेक सुदेवाड (तालुका आरोग्य अधिकारी), योगेश वानखेडे (सहायक गटविकास अधिकारी), निलेश वाघ, पी. एन. तेलंग, दीपक नवाथे, गोकुळ बांबल, बी. एम. जयस्वाल, बी. एम. सरदार, विशाल सुटे, प्रेम अंबूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती देण्यात आली. गावागावातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे, उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे तसेच लोकसहभागातून आरोग्य सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

कार्यशाळेत स्वच्छता, फिल्ड एफ.टी.के.द्वारे रासायनिक पाणी तपासणी, शुद्ध पिण्याचे पाणी, जलजन्य व कीटकजन्य साथीचे आजार, अॅनिमिया मुक्त भारत अभियान, माता-बाल आरोग्य, टीबी मुक्त ग्रामपंचायत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, आबा कार्ड, सिकल सेल अॅनिमिया जनजागृती तसेच विविध आरोग्य योजनांची १०० टक्के अंमलबजावणी याबाबत उपस्थित सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post