अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक तळेगाव दशासर पोलिसांच्या ताब्यात

 



दहा दिवसात पोलिसांची दुसरी कारवाई


जिल्हा प्रतिनिधी| निलेश रामगावकर 

स्थानिक येथील पोलिस अधिकारी किरण औटे व पोलिस अंमलदार यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करणे करिता गस्त करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सकाळी सात वाजताच्या दरम्यान तळेगाव ते चादूर रेल्वे रोडवरील शेंदुरजना खुर्द शेतशिवरात पंचसमक्ष कारवाई केली असता एक टाटा ट्रक (हायवा) क्रमांक एम एच 27 डी टी 9498 मिळून आल्याने पंचसमक्ष त्याची पाहणी केली असता त्यामध्ये बिना रॉयल्टी 10 ब्रास काळी रेती मिळून आली. त्यामुळे 55 लाख रुपयांचा ट्रक व 1 लाख 30 हजार रुपयांची दहा ब्रास रेती असा एकूण 56 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल तळेगाव पोलिसांनी जप्त केला असून हेड कॉन्स्टेबल अमर काळे यांच्या फिर्यादीवरून चालक हमीद बुद्धू लूचे वय 44 वर्ष रा. गवळीपुरा अमरावती व ट्रक मालक मोहम्मद शकील शेख हबीब रा. गणेश पेठ, प्रवीण नगर अमरावती यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे अप क्रमांक 138/2026 कलम 302(2),3(5)भारतीय न्याय संहिता 2023, कलम 9,15 पर्यावरण संरक्षण अधिनियम1986, कलम 3,7 सार्वजनिक संपती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 व कलम 130(1), 177 मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे अनिल पवार, पोलीस निरीक्षक किरण वानखेडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार किरण औटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर काळे, कॉन्स्टेबल यशवंत काळे, गौतम गवळे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post