पांढरकवडा : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त आज पांढरकवडा नगरातील गोपाळकृष्ण मंदिर येथे उभारण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण बूथला नगराध्यक्ष सोनुभैया बोरेले यांनी सदिच्छा भेट देऊन मोहिमेची पाहणी केली.
यावेळी त्यांनी उपस्थित पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले. "आजची बालके ही उद्याचे भविष्य आहेत. त्यांना पोलिओपासून सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. सर्वांनी आपल्या बालकांना पोलिओची लस देऊन राष्ट्रकार्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावावा," असे आवाहन नगराध्यक्ष सोनुभैया बोरेले यांनी केले.
या वेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
#PolioDay #PulsePolio #Pandharkawda #SonubhaiyaBorele #PolioFreeIndia #GavakadchiBatmi


