‘मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त – विश्वास, विकास आणि जनकल्याणाची यशोगाथा’ 🇮🇳🚩
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त विशेष कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ मा. प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात आणि नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले.
या अभियानाद्वारे शासनाच्या विविध लोकाभिमुख व कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महसूल विभागासह ग्रामविकास, पंचायत राज, कृषी, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, आरोग्य, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही केली.
यावेळी पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच इतर विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन अधिकाधिक नागरिकांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. आधुनिक शेतीला चालना देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
उपस्थित नागरिकांनी शासनाच्या योजनांबाबत समाधान व्यक्त करत अशा अभियानांमुळे शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या संकल्पनेनुसार केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.


