प्रतिनिधी,श्रीकांत राऊत यवतमाळ
उमरखेड :- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळने उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा व देवसरी येथे अवैध देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून कारवाई केली.
26 जून 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत फकीरा मुकुंद देवणे (रा. देवसरी) व शिवराम बाबुराव गंदेवार (रा. साखरा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ₹23,270 किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे ्यक उपनिष निरीक्षक अमोल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
