जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
Gavakadachi batmi network
ग्रामविकासासोबतच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर जनजागृती करणारी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारी युवाशक्ती ग्रामविकास संगठन ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते.
युवाशक्ती ग्रामविकास संगठन राज्यभरात कार्यरत असून संघटनेचा विस्तार महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये वेगाने होत आहे. त्याच अनुषंगाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी चांदूर बाजार तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
ही नियुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन पाटणकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद घाटे यांच्या उपस्थितीत तसेच संस्थापक/अध्यक्ष इमरान पठाण, सचिव डॉ. पुरुषोत्तम सदार, अमरावती जिल्हा संघटक संतोष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये ज्योत्सना गावनेर यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच मुकेश अलोने (तालुका सचिव), सुयोग वाटकर (सहसचिव), निलेश पाटील व साक्षी धनसांडे (उपाध्यक्ष), योगेश ईसळ (तालुका संघटक), मिथुन देशमुख (कोषाध्यक्ष), मयूर खैरकर (सहकोषाध्यक्ष), सचिन बागडे (प्रसिद्धी प्रमुख) आणि नंदूजी अलोने (कार्यकारिणी सदस्य) यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अमरावती जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद घाटे यांनी मार्गदर्शन करतांना संघटनेच्या नियमांचे पालन करून ग्रामविकास क्षेत्रात संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि भ्रष्टाचाराविरोधात संघटितपणे लढा देणे, यासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
