गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593
नांदेड : जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील दुर्गम असलेलं सावरखेड गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस पोहोचली असून ग्रामस्थांनी जल्लोषात तिचं स्वागत केलं. विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर गावासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना वाहतुकीचा मोठा दिलासा मिळला आहे.पिंटू पाटील वायफणीकर यांनी जनतेची सेवा हाच एकमेव सेवा समजुन लोकांना मदतीचा हात पुढे करत त्यांना गरज असलेल्या सवलतींचा पाठपुरावा करून लोकांना त्याचा लाभ मिळण्यास मदत करत आहेत अतिशय उत्तमरीत्या त्यांनी हे काम करत असून लोकांमध्ये त्यांची चर्चा चालू आहे..
